अपूर्णांक - नवोदय,सैनिकी स्कूल गणित चाचणी 09

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, सैनिक स्कूल, बी टी एस, एम टी एस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी गणित विषयावर आधारित सराव चाचणी सोडवा. विद्यार्थी मित्रहो, सर्वप्रथम आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करीत आहात यासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. अतिप्रतिभावान विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात आपणास प्रवेश मिळावा, यासाठी सराव चाचणीच्या माध्यमातून आपल्या यशात खारीचा वाटा उचलण्यासाठी मी एक प्रांजळ व निःस्वार्थ प्रयत्न केलेला आहे. परीक्षेतील बदलते स्वरूप, पद्धती व काठिण्यपातळी डोळ्यांसमोर ठेवून या सराव चाचण्यांची आखणी केली आहे. या सराव चाचण्या जास्तीत जास्त सोडविण्याचा सराव केला. त्याला जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड दिल्यास आपण हमखास यशस्वी व्हाल. https://forms.gle/u5jqCuvD1rim6WSp6
इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' व, नवोदय व सैनिकी स्कूल ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा | या परीक्षेसाठीचा अद्ययावत अभ्यासक्रम आणि परीक्षा परिषदेच्या आजवरच्या प्रश्नपत्रिका यांनुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (मिडलस्कूल स्कॉलरशिप), नवोदय व सैनिकी स्कूल या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आम्ही या ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून देत आहोत. प्रस्तुत ऑनलाइन परीक्षेत अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक-उपघटक प्रकरणवार प्रश्न समाविष्ट करण्यात आला आहे. प्रत्येक घटक-उपघटकावर प्रश्न देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. दररोज सकाळी लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून या प्रश्नांचे मार्गदर्शन आणि नमुना प्रश्न / उदाहरणे दिली आहेत. त्यानंतर सरावासाठी भरपूर प्रश्न देण्यात आले आहेत. हे प्रश्न देताना इयत्ता 5 वीच्या विदयार्थ्यांचा वयोगट लक्षात घेतला असून; सोप्या, मध्यम व कठीण स्वरूपांच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून विदयार्थ्यांना या परीक्षेत अपेक्षित असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा पुरेसा सराव मिळेल.

No comments:

Post a Comment