लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या ,नवोदय,स्कॉलरशिप व सैनिकी स्कूल गणित चाचणी 02


विद्यार्थी मित्रांनो तुम्ही छान अभ्यास करत आहात. आज मि चाचणीचे आयोजन केले आहे. मागील दिवसात झालेल्या अभ्यासावर आधारित ही चाचणी असणार आहे. आपणास खूप खूप शुभेच्छा 👍👍 इयत्ता पाचवीची 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' व, नवोदय व सैनिकी स्कूल ही शालेय जीवनातील पहिली स्पर्धात्मक परीक्षा | या परीक्षेसाठीचा अद्ययावत अभ्यासक्रम आणि परीक्षा परिषदेच्या आजवरच्या प्रश्नपत्रिका यांनुसार पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (मिडलस्कूल स्कॉलरशिप), नवोदय व सैनिकी स्कूल या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे प्रश्न आम्ही या ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून देत आहोत. प्रस्तुत ऑनलाइन परीक्षेत अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक-उपघटक प्रकरणवार प्रश्न समाविष्ट करण्यात आला आहे. प्रत्येक घटक-उपघटकावर प्रश्न देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. दररोज सकाळी लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून या प्रश्नांचे मार्गदर्शन आणि नमुना प्रश्न / उदाहरणे दिली आहेत. त्यानंतर सरावासाठी भरपूर प्रश्न देण्यात आले आहेत. हे प्रश्न देताना इयत्ता 5 वीच्या विदयार्थ्यांचा वयोगट लक्षात घेतला असून; सोप्या, मध्यम व कठीण स्वरूपांच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. जेणेकरून विदयार्थ्यांना या परीक्षेत अपेक्षित असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा पुरेसा सराव मिळेल.

No comments:

Post a Comment