पृथ्वी आणि चंद्रlसैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा

पृथ्वी आणि चंद्रसूर्यमाला

  • पृथ्वीच्या आकार गोलाकार असून मध्यभागी फुगीर आहे.
  • पृथ्वीच्या अभ्यासासाठी तयार करण्यात आलेली वस्तू पृथ्वीगोल होय.
  • पृथ्वी गोळ्याच्या मध्यातून जाणाऱ्या उभ्या काल्पनिक रेषेस अक्ष असे म्हणतात.सूर्यमाला
  • पृथ्वीचा अक्ष हा 23 पूर्णांक एक छेद दोन अंशाने कललेला आहे.
  • अक्ष हा पृथ्वीच्या पृष्ठभागास ज्या बिंदूत छेदतो त्या दोन बिंदूंना ध्रुव म्हणतात.
  • पृथ्वीला दोन ध्रुव आहेत -  1) दक्षिण ध्रुव   2) उत्तर ध्रुव
  • पृथ्वी गोलावरील उभ्या काल्पनिक रेषांना रेखांश म्हणतात
  • पृथ्वी गोलावर एकूण 360 रेखांश  ( उभ्या रेषा ) आहेत.
  • ज्या उभ्या रेषेपासून रेखांशाची सुरुवात होते त्या रेखांशाला मुख्य रेखांश किंवा शून्य रेखावृत्त असे म्हणतात.
  • मुख्य रेखावृत्त हा सुरुवातीचा बिंदू आहे ज्यापासून पूर्व आणि पश्चिमेकडील अंतर मोजले जाते.
  • मुख्य रेखावृत्ताच्या साह्याने आपण जागतिक वेळ दर्शवितो.
  • मुख्य रेखावृत्तावर म्हणजेच ग्रीनिच रेषेवर दुपारी 12: 00 वाजले असतील तर मुख्य रेखावृत्तावरील सर्वच ठिकाणी दुपारी बारा वाजले असतील.

  • पृथ्वी सूर्याभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते त्यावेळी जी ठिकाणी गिरणीत रेषेच्या म्हणजेच मुख्य रेखावृत्ताच्या पूर्वेला आहेत त्या ठिकाणी ग्रीनिच वेळेच्या पुढे  असतील व जी ठिकाणे ग्रीनिच रेषेच्या पश्चिमेला आहेत ती ठिकाणे ग्रीनिच वेळेच्या मागे असतील.
  • पृथ्वी ही सूर्याभोवती 24 तासात 360 अंश फिरतेसूर्यमाला
  •  पृथ्वी 4 मिनिटात 1 अंश फिरते.
  •  पृथ्वी 1 तासात 15 अंश फिरते.
  •  ग्रीनिच रेषेपासून 15 अंश पूर्वेकडे पुढे गेल्यानंतर वेळेत सुद्धा 1 तास पुढे जावे लागते.
  •  ग्रीनिच रेषेपासून 15 अंश मागे पश्चिमेकडे गेल्यानंतर वेळेत सुद्धा 1 तास मागे जावे लागेल.
  •  भारताच्या पश्चिम व पूर्वेकडील ठिकाणांमध्ये 1 तास 45 मिनिटांचा फरक असतो.
  •  भारत हा ग्रिनीच रेषेपासून 5 तास 30 मिनिटे पुढे आहे.
  •  भारताची प्रमाण वेळ ही 82.30 पूर्व  रेखांशावर आहे
  •  82.30 पूर्व रेखावृत्त हे अलाबाद ( उत्तरप्रदेश)  या शहरातून जाते.
  •  या वेळेस भारतीय प्रमाण वेळ म्हणतात
  •  भारतीय प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे आहे.

No comments:

Post a Comment