राज्यघटना निर्मिती l सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा
राज्यघटना निर्मिती
संविधान निर्मिती प्रक्रिया
- भारतात संविधान निर्मिती करण्यासाठी जुलै १९४६ मध्ये घटना समितीच्या निवडणूका घेण्यात आल्या.
- घटनासमितीची पहिली बैठक दिल्ली येथे ९ डिसेंबर १९४६ रोजी घेण्यात आली.
- तात्पुरते अध्यक्षपद डॉ. सचिदानंद सिन्हा यांच्याकडे देण्यात आले होते.
- ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
- घटना समितीचे कामकाज ९ डिसेंबर १९४६ ते २६ नोव्हेंबर १९४९ पर्यंत चालले.
- घटनानिर्मितीचे कार्य २ वर्षे ११ महिने १८ दिवस चालले.
- घटनापरिषदेच्या एकूण ११ बैठका झाल्या.
- घटना समितीच्या कामकाजावर एकूण ६३.९६,७२९ रुपये खर्च करण्यात आले.
- १९४७ च्या भारतीय स्वातंत्र्यकायद्यानुसार घटनासमितीला अधिकृत समिती म्हणून स्वतंत्र दर्जा प्राप्त झाला.
- २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसुदा समितीची निर्मिती करण्यात आली.समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली.
- संविधान निर्मिती अंतर्गत निर्माण केलेल्या १८ समित्यांपैकी सर्वात महत्त्वाची समिती ही मसुदा समिती होय. संविधानास अंतिम स्वरूप देण्याचे काम मसुदा समितीने केलेले असल्यामुळे डॉ. आंबेडकरांना भारतीय संविधानाचे जनक म्हटले जाते.
- भारतीय संविधानातील प्रस्तावना (उद्देश पत्रिका) लिहिण्याचे महत्त्वपूर्ण काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले.
- घटना समितीचे कायदेशीर सल्लागार डॉ. बी. एन. राव होते.
- झेंडा समितीचे अध्यक्ष जे. बी. कृपलानी होते.
- घटनेची पूर्तता दिन - २६ नोव्हेंबर, १९४९
- घटना लागू होण्याचा दिन - २६ जानेवारी, १९५०
- राज्यघटनेची गुरुकिल्ली - उद्देशपत्रिका
No comments:
Post a Comment