भारतीय संसद
- संसदीय शासन पद्धतीत संसद महत्त्वाची असते.
- भारतीय संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे.
- संसदेत राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांचा समावेश असतो.
- संसदेची राज्यसभा व लोकसभा अशी दोन सभागृह असतात.
- राज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत जागा असतात.
- महाराष्ट्रातून 48 खासदार लोकसभेत जातात.
- भारतीय संसदेचे कनिष्ठ व प्रथम सभागृह.
- लोकसभेचे सदस्य जनतेकडून थेटपणे निवडले जातात.
- लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात.
- लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 552 असते.
- अँग्लो इंडियन समाजास प्रतिनिधित्व न मिळाल्यास राष्ट्रपती दोन सदस्यांची नेमणूक करू शकतात.
- राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ व द्वितीय सभागृह असते.
- अप्रत्यक्षरीत्या निवडून येणारे सदस्य राज्यसभेत असतात.
- राज्यसभेतील एकूण सदस्य संख्या 250 पैकी 238 सदस्य घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात.
- 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती साहित्य विज्ञान कला क्रीडा इत्यादी क्षेत्रातून करतात.
- राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही.
- दर 2 वर्षांनी सहा वर्षे कार्यकाळ पूर्ण करणारे दोन तृतीयांश सदस्य निवृत्त होतात.
संसदेची कार्य
- लोककल्याणासाठी नवीन कायद्याची निर्मिती करणे.
- कालबाह्य झालेले कायदे रद्द अथवा दुरुस्त करणे.
- पंतप्रधान व मंत्रिमंडळावर संसदेचे नियंत्रण असते.
- संविधानात दुरुस्ती संसदेत होते.
लोकसभा अध्यक्ष
- निवडणुका नंतरच्या पहिल्या बैठकीत सदस्य अध्यक्षांची निवड करतात.
- आणखी एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात.
- अध्यक्ष मी पक्षपातीपणे लोकसभेचे कामकाज चालवितात.
राज्यसभा सभापती
- राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालते.
- भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात.
- सभागृहात शिस्त राखणे सर्व सदस्यांना बोलण्याची संधी देणे हे कार्य करतात.
- लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार या नावाने ओळखले जाते
- कायद्यांच्या निर्मितीची जबाबदारी संसदेची असते
- लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण केलेली असावी लागते
- राज्यसभेत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी लागते
- राष्ट्रपती पदासाठी तीस वर्षे वयाची अट असते
राष्ट्रपती
संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख असतात
राष्ट्रपती पद सन्मानाचे व प्रतिष्ठेचे मानले जाते
देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतीच्या नावाने चालतो
प्रत्यक्ष व्यवहारात पंतप्रधान व मंत्रिमंडळ राज्यकारभार करते
राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत
No comments:
Post a Comment