अक्षांश ( Latiludes ) सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा


अक्षांश ( Latiludes )

सध्या स्पर्धा परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शालेय स्पर्धा परीक्षेबाबत सजग पालकांमध्ये गांभीर्यही वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थी जीवनातील स्पर्धा परीक्षेचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा,सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा (इयत्ता ५ वी) या परीक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले असून मोठ्या संख्येने विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जात आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येते.
ही परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा कस पडताळणारी परीक्षा ! विद्यार्थ्यांच्या वेग व वेळ या व्यस्त राशींची सांगड घालणाऱ्या क्षमतेच्या सामर्थ्याची चाचपणी करणारी सत्वपरीक्षा! या सत्वपरीक्षेला विद्यार्थी आत्मविश्वासाने व यशस्वीपणे सामोरे जावा यासाठीच 'सराव प्रश्नपत्रिका संचा' ची निर्मिती करण्यात आली आहे.विद्यार्थी मित्रांनो तुम्ही छान अभ्यास करत आहात. आज मि चाचणीचे आयोजन केले आहे. मागील दिवसात झालेल्या अभ्यासावर आधारित ही चाचणी असणार आहे. आपणास खूप खूप शुभेच्छा 👍👍
  • पृथ्वी गोलावरील आडव्या काल्पनिक रेषेस अक्षांश म्हणतात.
  • पृथ्वी गोलावरील सर्वात मोठ्या आडव्या रेषेस विषुववृत्त म्हणतात.
  • पृथ्वी गोलावर विषुववृत्त मध्यभागी आहे.
  • विषुववृत्तामुळे पृथ्वीगोलाचे दोन समान भाग होतात.
  • 1) उत्तर गोलार्ध .
  • 2) दक्षिण गोलार्ध.  
  • दोन अक्षांशांमधील अंतर 111 कि.मी. असते. 
  • विषुववृत्तामुळे पृथ्वीगोलावर उत्तरेकडे म्हणजेच दक्षिण गोलार्धात 90 अक्षांश आहेत. 
  • विषुववृत्तामुळे पृथ्वीगोलावर दक्षिणेकडे म्हणजेच दक्षिण गोलार्धात 90 अक्षांश आहेत. 
  • विषुववृत्तापासून उत्तरेकडील 23 पूर्णांक 1 छेद 2 अक्षांशास कर्कवृत्त म्हणतात.
  • विषुववृत्तापासून दक्षिणेकडील 23 पूर्णांक 1 छेद 2 अक्षांशास मकर वृत्त म्हणतात. 
  • कर्कवृत्त भारतातील आठ राज्यातून जाते. 
  • 21 डिसेंबर रोजी मकरवृत्तावर सूर्याची किरणे सरळ रेषेत पडतात.

No comments:

Post a Comment