संसदीय शासन पद्धतीची ओळख
शासन संस्थेच्या तीन प्रमुख शाखा असतात.
1) कायदेमंडळ - कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते.
2) कार्यकारी मंडळ - कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते.
3) न्यायमंडळ - न्याय देण्याचे कार्य करते.
शासन पद्धतीचे दोन प्रमुख प्रकार असतात.
1. संसदीय शासनपद्धती
2. अध्यक्षीय शासन पद्धती
संसदीय शासन पध्दती
- संसदीय शासन पद्धती इंग्लंडमध्ये विकसित झाली.
- भारतीय संसदीय शासन पद्धती
- राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा मिळून संसद बनते.
- लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेट निवडले जातात.
- ठराविक मुदतीनंतर निवडणूक होते.
- बहुमतातल्या पक्षाचा नेता पंतप्रधान होते.
- प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ हेच कार्यकारी मंडळ असते.
- मंत्रिमंडळ कृती व धोरणांसाठी कायदे मंडळालाच जबाबदार असते.
अध्यक्षीय शासन पद्धती
- अमेरिकेत अध्यक्षीय शासन पद्धती आहे.
- राष्ट्राध्यक्ष हा थेट जनतेतून निवडला जातो.
- राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात.
- संसदीय शासन पद्धतीत केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळात संसद म्हणतात.
- अध्यक्ष शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुखा राष्ट्राध्यक्ष असतो.
- इंग्लंडचे संविधान अलिखित असून राज्यकारभारात रुड संकेताचे पालन केले जाते.
- संसदीय शासन पद्धतीत देशाचा नामधारी प्रमुख राष्ट्रपती असतो.
- संसदीय शासन पद्धती जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात.
No comments:
Post a Comment