संसदीय शासन पद्धती ओळख lसैनिकी स्कूल व एन एम एम एस

केंद्रीय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा,चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5 वीत व सहावीत शिकत असलेल्या मुलांना (वयोमानानुसार) विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देता येते म्हणजे परीक्षेस बसता येते. संपूर्ण भारत देशामध्ये सैनिकी शाळांची संख्या सत्तावीस (27) आहे. त्यावर केंद्रीय संरक्षण खात्याचे प्रशासकीय नियंत्रण असते. सर्व सैनिकी शाळांमध्ये इंग्रजी माध्यम असते, कारण नॅशनल डिफेन्स अॅकॅदमी (NDA) च्या प्रवेश परीक्षेचे माध्यम इंग्रजी असते. 27 सैनिकी शाळांपैकी पहिली सैनिक शाळा महाराष्ट्र राज्यात सातारा येथे दिनांक 23 जून 1961 रोजी सुरू झाली. तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळेचे संरक्षण मंत्री के. व्ही. कृष्णमेनन यांच्या शुभ हस्ते या सैनिक शाळेचे उद्घाटन झाले. या प्रवेश परीक्षेमध्ये गणित, सामान्यज्ञान, भाषा आणि बुध्दिमत्ता या चार विषयांचा समावेश असतो. हा अभ्यासक्रम केंद्रीय परीक्षा मंडळाच्या इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमाप्रमाणेच असतो. एन डी ए मध्ये विमान दल, नौसेना दल आणि भूदल विभागांमध्ये त्यांच्या योग्यते अनुसार प्रवेश दिला जातो. वरील सर्वच प्रवेश परीक्षा दर सहामाही मध्ये घेतल्या जातात. केंद्रीय सैनिक स्कूल, सातारा मध्ये प्रत्येक सहामाहीस मनःपूर्वक आभार मानतो, व्यक्त करतो. या मध्ये सैनिकी स्कूल प्रवेश परीक्षांमध्ये विचारलेल्या अनेक प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. यावरून प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेल्या आणि विचारणात येणाऱ्या प्रश्नांची जाण येण्यास मदत होते. प्रत्येक घटकांवर प्रश्न दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी प्रथम घटकांचा अभ्यास करावा आणि त्यावर आधारित दिलेले प्रश्न स्वतः सोडवावेत, सोडवण्याचा प्रयत्न करावा.आणि नंतरच स्पष्टीकरणे पाहावीत. असे केल्याने आपली प्रवेश परीक्षेची तयारी किती चांगली झाली आहे. हे समजून येण्यास मदत होईल आणि आपला अभ्यासाचा दर्जा वाढविता येऊ शेकतो. परीक्षार्थीना आम्ही THE BEST SUCCESS चिंतीतो.

No comments:

Post a Comment