सरळव्याज नवोदय गणित सराव चाचणी 02

सरळव्याज भारत सरकारने १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जवाहर नवोदय विद्यालये सुरु केली आहेत. जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेद्वारे प्रवेश देण्यात येतो. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. इयत्ता ५ वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी या परीक्षेसाठी बसू शकतो आणि निवड झालेनंतर संबंधित जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात त्याला प्रवेश दिला जातो. जवाहर नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणीमध्ये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित चाचणी आणि भाषा चाचणी अशा विषयांचा समावेश असलेली परीक्षा द्यावी लागते. सदर परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आम्ही माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या राज्यव्यापी उपक्रमा अंतर्गत इयत्ता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी दररोज गणित, मानसिक क्षमता चाचणी ‌ व भाषा या तिन्ही विषयांच्या यूट्यूब च्या माध्यमातून लाईव्ह तासिका घेतो तसेच तीनही विषयांची काठिण्यपातळी व अभ्यासक्रमाची सर्वसमावेशकता विचारात घेऊन बदललेल्या सुधारित अभ्यासक्रमानुसार व बदललेल्या प्रश्नपत्रिकेच्या रचनेनुसार ऑनलाइन चाचणी ची मांडणी केली आहे.सदर Online अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या यशापर्यंत जाण्यास निश्चितच उपयोग होईल याची खात्री वाटते. परीक्षेसाठी हार्दीक हार्दीक शुभेच्छा .......!

No comments:

Post a Comment