काळ काम वेग, नवोदय व सैनिकी स्कूल गणित चाचणी 02
काळ काम वेग
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षेचा अद्ययावत आराखडा आणि प्रश्नपत्रिका यानुसार "जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा.
समाजाच्या सर्व घटकांतील विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रत्येक जिल्ह्यात इयत्ता सहावीत प्रवेश करणाऱ्या हुशार मुलांसाठी खास 'जवाहर नवोदय विद्यालय स्थापन केले आहे.
ज्या विदयार्थ्यांकडे विशेष प्रज्ञा आहे आणि ज्यांचा सर्जनशीलतेकडे कल आहे, अशा विदयार्थ्यांना या जवाहर नवोदय विद्यालयांतून इयत्ता 8 पर्यंत विनामूल्य तर त्यापुढे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत माफक फी आकारून उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, या विद्यालयाच्या परिसरातील इतर शाळांनादेखील उत्तम शिक्षणाचा आदर्श ठेवता यावा, अशी शासनाची योजना आहे. अशा प्रकारे, उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी इयत्ता पाचवीत असतानाच घेतल्या जाणाऱ्या या प्रवेशपरीक्षेस बसणे आवश्यक असते. या परीक्षेला 'निवड परीक्षा' असेही म्हटले जाते.
या प्रवेशपरीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित व भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते. विदयार्थ्यांना या महत्त्वाच्या परीक्षेची नीट तयारी करणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विध्यार्थ्यांसाठी “माय व्हिजन, नवोदय अॅडमिशन" या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन पुरविणाऱ्या उपक्रमांतर्गत आम्ही एक पावूल पुढे टाकत आहोत आणि शिकण्याचा आनंद अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
शालेय जीवनातील पाचवी वर्गातील विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करतात आणि प्रत्येक जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यापैकी केवळ 80 विद्यार्थी प्रत्येक जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात प्रवेशास पात्र ठरतात.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षेस बसणाऱ्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल, असा आम्हांला दृढ विश्वास वाटतो.
Tags:Jnv Paper, Practice tet
काळ काम वेग
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment