गुणोत्तर प्रमाण , नवोदय,सैनिकी स्कूल गणित चाचणी 03

गुणोत्तर प्रमाण "जेव्हा दोन राशींची तुलना भागाकाराने करतात, तेव्हा त्या संख्यांच्या भागाकाराला 'गुणोत्तर' म्हणतात. गुणोत्तर दाखवण्यासाठी ':' हे चिन्ह वापरतात. उदा. 4 चे 7 शी गुणोत्तर = किंवा '4:7' असे लिहितात. कोणतेही अतिसंक्षिप्त रूपात लिहितात. एकाच प्रकारच्या दोन राशींचे गुणोत्तर काढताना त्यांची एकके समान करून घ्यावी लागतात, गुणोत्तराला एकक नसते. जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात, तेव्हा त्या गुणोत्तरातील संख्या प्रमाणात आहेत असे म्हणतात. जेव्हा एका राशीची किंमत बदलते तेव्हा तिच्याशी संबंधित दुसरी राशी देखील बदलते. अशा बदलास 'चलन' म्हणतात. जेव्हा एक बाब वाढते तेव्हा तिच्याशी संबंधित बाब वाढते, एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते आणि या दोन बाबींचे गुणोत्तर स्थिर असते तेव्हा ते समचलनाचे उदाहरण असते. जेव्हा एक बाब वाढल्यास तिच्याशी संबंधित बाब कमी होते, एक बाब कमी झाल्यास तिच्याशी संबंधित बाब बाढते आणि या दोन बाबींचा गुणाकार स्थिर असतो, तेव्हा हे व्यस्त चलनाचे उदाहरण असते.

No comments:

Post a Comment