कोन आणि कोनाचे प्रकार नवोदय गणित सराव चाचणी 01

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षेमधील अंकगणित विषयाचा नवीन अभ्यासक्रम आणि भाषा विषयातील व्याकरणविषयक प्रश्नांचा कल यांनुसार 'जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षा ही संपूर्णतः नवीन चाचणी देताना आम्हांस अत्यंत आनंद होत आहे. समाजाच्या सर्व घटकांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रत्येक जिल्ह्यात इयत्ता सहावीत प्रवेश करणाऱ्या हुशार मुलांसाठी खास 'जवाहर नवोदय विद्यालय' स्थापन केले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे विशेष प्रज्ञा आहे आणि ज्यांचा सर्जनशीलतेकडे कल आहे, अशा विद्यार्थ्यांना या जवाहर नवोदय विद्यालयांतून इयत्ता आठवीपर्यंत विनामूल्य तर त्यापुढे उच्च माध्यमिक स्तरापर्यंत माफक फी आकारून उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, या विद्यालयाच्या परिसरातील इतर शाळांनादेखील उत्तम शिक्षणाचा आदर्श ठेवता यावा, अशी शासनाची योजना आहे. अशा प्रकारे, उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी इयत्ता पाचवीत असतानाच घेतल्या जाणाऱ्या या प्रवेशपरीक्षेस बसणे आवश्यक असते. या परीक्षेला 'निवड परीक्षा' असेही म्हटले जाते. या प्रवेशपरीक्षेत मानसिक क्षमता चाचणी, अंकगणित व भाषा या तीन विषयांची चाचणी घेतली जाते. विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या परीक्षेची नीट तयारी करता यावी, याकरिता 'नवनीत' मधील तज्ज्ञ व अनुभवी लेखकांनी प्रश्नपत्रिकेचा अद्ययावत आराखडा आणि अंकगणिताचा नवीन अभ्यासक्रम व भाषेमधील व्याकरणविषयक प्रश्नांचा कल यांनुसार 'हे संपूर्णतः नवीन मार्गदर्शक तयार केले आहे. यामध्ये वरील तिन्ही विषयांचे प्रश्न कसे सोडवावेत, याचे अचूक मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांत विविध प्रश्न सोडवण्याचा सराव करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने सदर मार्गदर्शकात सरावासाठी भरपूर स्वाध्याय देण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तेथेच नोंदवण्यासाठी परीक्षापद्धतीच्या अपेक्षेनुसार ओ.एम. आर. पद्धतीची वर्तुळे प्रत्येक प्रश्नासमोर देण्यात आली आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना ओ.एम. आर. पद्धतीने उत्तरे नोंदवण्याचाही भरपूर सराव मिळेल. सरावासाठी दिलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरेही देण्यात आली आहेत. अत्यंत उपयुक्त ठरेल, असा आम्हांला दृढ विश्वास वाटतो.

No comments:

Post a Comment